धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी भाजप महायुतीच्या उमेदवार यांच्या प्रचारासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार असुन ते 29 जानेवारी रोजी ढोकी येथे प्रचार सभा घेणार आहेत. फडणवीस यांच्या आगमनाची तयारी करण्यात आली असुन ते मार्गदर्शन करणार आहेत. आमदार राणाजागजीसिंह पाटील, भाजप नेते सुजितसिंह ठाकुर,जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी, बसवराज पाटील यांच्यासह पदाधिकारी याची जय्यत तयारी करीत आहेत.












