धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांनी वडिलांच्या मृत्यूचे दुःख बाजुला ठेवत अंत्यसंस्कार करून लगेच पुरग्रस्त शेतकरी यांच्या मदतीला धावले आहेत. कायम दुष्काळग्रस्त अशी ओळख असलेल्या धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे न भुतो न भविष्यती अशी स्तिथी निर्माण झाली आहे, शेतकरी यांचे संसार उघड्यावर आले असुन बळीराजा दुःखात आहे, हे वेदनादायी चित्र पाहून संवेदनशील मनाचे असलेल्या घोष यांनी सेवा व कर्तव्य प्रथम असे म्हणत शेतकऱ्यांच्या मदतीला धावले आहेत.
घोष हे एक आयएएस अधिकारी असुन त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या दुःखात धाराशिवकर सहभागी आहेत. वडिलांच्या मृत्यूचे दुःख विसरून शेतकऱ्यांच्या वेदनांना प्राधान्य दिल्याचे भावनिक चित्र जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे.
एकीकडे न थांबनारा मुसळधार पाऊस, पुर, पिकांचे नुकसान, जनावरे मयत, शेतजमिनी वाहून गेलेल्या, पिके पाण्यात, पडलेली घरे, नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, शासकीय मदत, पंचनामे, आकडेवारी देणे व अंमलबजावणी अश्या अनेक आघाड्यावर जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष, पोलिस अधीक्षक रितु खोखर हे जबाबदारी पार पाडत असताना मैनाक घोष यांच्या वडिलांच्या मृत्यूची दुःखद बातमी आली, त्यावेळी घोष यांना त्यांनी आधार दिला.
माणिकराव घोष यांच्यावर धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते., उपचार दरम्यान त्यांचे 27 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता मृत्यू झाला त्यानंतर त्यांनी वेळ न घालवता सोलापूर येथील महानगरपालिकेच्या विद्युत दहनीत सायंकाळी अंत्यसंस्कार केले, त्यावेळी धाराशिव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी व सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आधार देत सर्व नियोजन केले, वडिलांचा अंत्यविधी करून परत आल्यावर लगेच घोष यांनी पुर व स्तिथीचा आढावा बैठका सुरु केल्या.
पश्चिम बंगालचे असलेल्या घोष कुटुंबीयांचा सोलापूरशी कुठलाही संबंध नसतानाही, तेथे वडिलांचा अंत्यविधी पार पडला. घोष हे महाराष्ट्रात जिथे जिथे नौकरीला होते तिथे त्यांनी आई वडील यांना आपल्या सोबत ठेवले, त्यांनी शेवट पर्यंत वडिलांची सेवा केली. त्यांच्या जडणघडणीत त्यांच्या वडिलांचा मोठा हात होता, त्यांचे वडील हे प्रेसमध्ये कर्तव्यावर होते त्याचे माध्यम क्षेत्रात मोठे योगदान आहे त्यामुळे त्यांना धाराशिव जिल्ह्यातील पत्रकार व पत्रकार संघांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली
वडिलांचा अंत्यसंस्कार एकीकडे तर दुसरीकडे आईची तब्येत आजारी असताना घोष यांनी काम सुरु ठेवले. 28 सप्टेंबर रोजी त्यांनी वडगाव सिद्धेश्वर येथे फुटलेल्या तलावाच्या पाहणी केली. जोरदार पावसामुळे पाण्याची पातळी धोक्याची झाली होती. तलावातून पाणी वरून वाहत असल्याने या गंभीर स्थितीची माहिती वडगावचे युवा नेते अंकुश काका मोरे, पंचायत समितीचे माजी सदस्य गजेंद्र जाधव यांनी फोनद्वारे घोष यांना दिली..
जिल्हा जलसंधारण अधिकारी, संतोष नलावडे गटविकास अधिकारी पंचायत समिती धाराशिव, ग्रामसेवक सुदर्शन घोगरे, तलाठी भाड यांना तातडीने पाझर तलावाच्या सांडव्याची खोली वाढवून पाण्याचा प्रवाह सुरक्षितपणे काढून देण्याचे आदेश दिले.