आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांचे गंभीर आरोप
धाराशिव – समय सारथी
रेल्वे भुसंपादन मावेजा प्रकरणी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या अन्नात माती कालवुन नुकसान केले,केवळ उदघाट्नाच्या श्रेयायासाठी अधिकाऱ्यांवर दबाव टाकला असा गंभीर आरोप ओमराजे निंबाळकर यांनी केला.
रेल्वे भुसंपादन मावेजा प्रकरणात शेतकरी सुरुवातीला आमदार कैलास पाटील यांच्याकडे गेले नंतर आम्ही महाराष्ट्रात रेल्वेचे इतर भुसंपादन कश्या पद्धतीने होते हे आम्ही पाहिले त्यावेळी आमच्या लक्षात आले की इतर जिल्ह्यात थेट खरेदी म्हणजे डायरेक्ट पर्चेस करुन शेतकऱ्यांच्या जमिनी घेतल्या गेल्या. त्याचा फायदा शेतकऱ्यांना काय झाला तर त्यांच्या जमिनीच्या मूल्यांकनाच्या 5 पट मोबदला त्या शेतकऱ्यांना मिळाला असे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पत्रकार यांच्याशी बोलताना सांगितले, यावेळी आमदार कैलास पाटील उपस्थितीत होते.
धाराशिव जिल्ह्यात सोलापूर तुळजापूर धाराशिव जो रेल्वेमार्ग होतोय त्या प्रकल्पात ज्या शेतकऱ्याच्या जमिनी संपदीत होणार आहेत, त्या शेतकऱ्यांना 5 पटीने मोबदला मिळावा अशी माझी व आमदार कैलास पाटील यांची अपेक्षा होती व शेतकऱ्यांची सुद्धा तशी मागणी होती.
तुळजापूरचा शहाणा (आमदार राणाजगजीतसिंह पाटील) म्हणाला, की नाही नाही हे कोणी तरी तुम्हाला मुर्खात व वेड्यात काढत आहे असे शेतकऱ्यांना सांगितले गेले तेव्हा आम्ही जिल्हाधिकारी यांना लेखी पत्र दिले व मागणी केली तेव्हा जिल्हाधिकारी यांनी थेट खरेदीचा प्रस्ताव पाठवला. आमदार राणा हे शेतकऱ्यांना थेट खरेदीचे सांगत होते तर दुसरीकडे अधिकारी यांच्यावर दबाव टाकून अवॉर्ड करायला भाग पाडत होते असा आरोप ओमराजे यांनी केला.
रेल्वेचे 70 टक्के भुसंपादन झाल्या शिवाय कुठल्याही कामाचे टेंडर निघत नाही, मात्र धाराशिव येथील रेल्वे मार्गाचे टेंडर निघण्याची ही इतिहासातील पहिली घटना असेल. निवडणुकाजवळ येत आहेत व त्यांचे श्रेय मिळावे यासाठी केलेला हा केविलवाणा प्रकार केला गेला. शेतकऱ्यांच्या तोंडात, अन्नात माती कालवून जर अश्या पद्धतीने त्यांचे नुकसान करणार असाल तर ते निषेधार्य आहे. लोकप्रतिनिधी म्हणून शेतकऱ्यांचे हीत पाहिले व करायला पाहिजे आणि ती अपेक्षा मला आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडून आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.