धाराशिव – समय सारथी
नळदुर्ग ते तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर एक संशयित बॅग सापडली असुन पोलिस त्याचा तपास करीत आहेत. घटनास्थळी फॉरेन्सिक विभागाची टीम व पोलीस पोहचले असुन त्या बॅगेत अंमली पदार्थ असल्याची माहिती पोलिस अधीक्षक रितु खोखर यांनी दिली. जप्त केलेला अंमली पदार्थ Hash ऑइल असुन त्याचे वजन हे जवळपास 10 किलो असुन बाजार भावानुसार त्याची किमत 10 कोटी रुपयांच्या आसपास आहे.
नाकाबंदी करताना पोलिसांना एका वाहनावर संशय आला त्यानंतर त्यांनी त्याला अडवल्यानंतर 2 संशयित व्यक्तींनी एक बॅग रस्त्यावर फेकून पळ काढला. हा अमली पदार्थ हा नेमका कुठे जात होता याचा तपास पोलिस घेत आहेत. पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु असुन एक मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. धाराशिव जिल्ह्यात अश्या प्रकारचा अमली पदार्थ पहिल्यांदाच सापडला आहे.
Hash oil म्हणजे गांजाचा खूप powerful प्रकार आहे, ज्याचा वापर आरोग्यासाठी धोकादायक आहे. त्यामुळे तो स्वतःच “final drug” मानला जातो. गांजाच्या (cannabis) वनस्पतीपासून तयार केलेले एक अत्यंत concentrated (घन) द्रव्य आहे. याला cannabis oil, BHO (Butane Hash Oil) असेही म्हणतात. गांजामधील मुख्य नशा देणारा घटक THC (Tetrahydrocannabinol) याचे प्रमाण खूप जास्त असते, साध्या गांजापेक्षा खूपच strong (जास्त प्रभावी) असते. NDPS Act (1985) अंतर्गत गांजा व त्याचे products जसे hash oil बेकायदेशीर आहेत.











