धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित असुन जिल्ह्यातील 8 पंचायत समितीचे आरक्षण जाहीर झाले आहे. 8 पैकी 2 सभापती जागा खुले अर्थात सर्वसाधारण प्रवर्ग , 6 सभापती आरक्षीत जागा आहेत.
2 सभापती जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी,1 जागा अनुसूचित जातीसाठी, 1 नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी, 1 नागरिकांच्या मागास प्रवर्ग ओबीसी महिला, 3 सभापती जागा महिलांसाठी आरक्षित ठेवल्या आहेत. त्यातील सोडत लवकरच निघणार आहे.
धाराशिव जिल्ह्यात धाराशिव, भुम, परंडा, वाशी, कळंब, लोहारा, तुळजापूर, उमरगा अश्या 8 पंचायत समिती असुन जिल्हा परिषदेचे 55 गट आहेत तर पंचायत समितीचे 110 गण आहेत.