धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील कचरा समस्याला नवीन कार्यकारिणीने प्राधान्य दिले असुन स्वच्छ धाराशिव अभियान राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्या अंतर्गत धाराशिव शहरात प्रभाग निहाय नेमणुका करण्यात आल्या असुन कचरा, अस्वच्छता याबाबत काही तक्रार असल्यास संपर्क करावा असे आवाहन उपनगराध्यक्ष तथा आरोग्य स्वच्छता सभापती अक्षय ढोबळे यांनी केले आहे.

स्वच्छतेच्या संबंधित संपर्क करण्यासाठी प्रत्येक प्रभागाच्या सुपरवायजरचे मोबाईल नंबर सर्व शहरातील जनतेसाठी उपलब्ध केले आहेत. आमदार राणाजगजीतसिंह पाटील, युवा नेते मल्हार पाटील यांनी 100 दिवसांचा संकल्प केला असुन त्या अंतर्गत अनेक उपक्रम सुरु करण्यात येत आहेत.
धाराशिव शहरात अस्वच्छता असेल,नाली ब्लॉक झाली,कचऱ्याचे ढीग,घंटा गाडी अश्या कोणत्याही स्वच्छतेच्या संबंधित तक्रार असेल दिलेल्या या सुपरवायजर (देखरेख ठेवणारा) च्या नंबर वरती संपर्क करायचा आहे,आपण कोणत्या प्रभागात राहतो हे पाहून त्या संबंधित सुपरवायजर असणाऱ्या व्यक्तीला संपर्क करा ,काही प्रभागात सुपरवायजर नाहीत तेथील नागरिकांनी संबंधित झोनल अधिकाऱ्याला तेथील तक्रार नोंदवायची आहे.











