धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषदेच्या विषय समितीच्या सभापतीच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या आहेत. आरोग्य व स्वच्छता समितीच्या सभापतीपदी उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे यांची निवड करण्यात आली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापती म्हणून वैशाली सुशांत सोनवणे यांची तर उपसभापती म्हणून दीपाली धनंजय पाटील यांची निवड झाली. सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी अभिजित काकडे यांची निवड करण्यात आली.
पाणीपुरवठा व जलनिसारण समितीच्या अध्यक्षपदी विलास मारुती लोंढे यांची तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण माळी यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समितीच्या अध्यक्षपदी आकाश तावडे यांची निवड करण्यात आली आहे. या विशेष सभेसाठी पिठासीन अधिकारी म्हणून तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी काम पाहिले. नगराध्यक्षा नेहाताई काकडे आणि मुख्याधिकारी नीता अंधारे यांचीही उपस्थिती होती.
स्थायी समितीचे निमंत्रित सदस्य म्हणुन अमित शिंदे, अभिजित पतंगे व शेख इस्माईल यांची निवड करण्यात आली आहे.











