धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील 4 नगर परिषदमधील स्थायी समिती आणि विषय समितीच्या निवडी आज होणार आहेत. 24 जानेवारी रोजी धाराशिव, नळदुर्ग, मुरूम आणि कळंब या नगर परिषदामधील निवडी होणार आहेत.
धाराशिवमध्ये भाजप पक्षात अंतर्गत गटबाजी, धुसफूस व जातीय समीकरण महत्वाचे ठरणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष पद हे ओबीसी प्रवर्गला दिल्यानंतर विषय समितीत कोणाचा नंबर लागतो हे पहावे लागेल, दुपारी 4 नंतर चित्र स्पष्ट होणार आहे.
तुळजापूर, उमरगा, भूम आणि परंडा या नगरपालिकांसाठी 25 जानेवारी 2026 रोजी विशेष सभांचे आयोजन करण्यात आले आहे. या नगरपालिकांतील नगरसेवकांना विषय समिती सदस्यपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी सकाळी 11 वाजेपर्यंत वेळ देण्यात आला आहे. याच दिवशी दुपारी 4 वाजता विषय समितीच्या सभापती पदासाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.











