धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगर परिषद सार्वत्रिक निवडणूकीत राज्य निवडणुक आयोगाने 3 नगरसेवक पदांच्या जागावर निवडणुक घेण्यास स्थगिती दिली आहे, त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी राज्य निवडणुक आयोगाला पत्र देत जिल्हा न्यायालयाचा निकाल कळविला आहे. आहे त्या निवडणुक कार्यक्रम प्रमाणे मतदान घ्यावे असे प्रशासन व राजकीय पक्षाच्या नेत्यांचे म्हणणे असुन त्यावर आयोग काय निर्णय घेतो हे पाहवे लागेल.
आयोगाच्या निर्णयाची जिल्हा प्रशासनाला प्रतीक्षा असुन त्यानंतर पुढील दिशा ठरणार आहे. 3 जागावर स्थगिती असल्याने मतदान व मतमोजणी प्रक्रियावर त्याचा परिणाम होऊ शकतो. प्रभाग क्रमांक 2, 7 व 14 मधील 3 जागाना स्थगिती दिली आहे.
नामनिर्देशन पत्र छाननी नंतर प्राप्त आकक्षेपावर सुनावणी घेतल्यानंतर घेण्यात आलेल्या निर्णयाविरोधात जिल्हा न्यायालयात दाखल अपिलाची सुनावणी झालेली आहे. न्यायालयाचा निकाल प्राप्त झाला असून तो जिल्हा प्रशासनाने निवडणुक आयोगाला कळविला आहे.
धाराशिव न्यायालयाने अमित दिलीपराव शिंदे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरविला आहे. सबब यामध्ये चिन्ह वाटप गरजेचे नाही कारण शिंदे व कृष्णा पंडीत मुंडे हे मान्यता प्राप्त पक्षाचे उमेदवार आहेत. सोनाली स्वप्नील माने यांचा अवैध ठरवलेला अर्ज न्यायालयाने वैध ठरविला आहे. यामध्ये पर्यायी उमेदवार हा मान्यता प्राप्त पक्षाचा होता. सबब नवीन न्यायनिर्णया नुसार मुख्य उमेदवार हा मान्यता प्राप्त पक्षाचा आहे. सबब चिन्ह वाटप करणे गरजेचे नाही.
अर्जदार संजयकुमार वाघमारे यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी व न्यायालय या दोघांनी अवैध ठरवला आहे. सदर उमेदवार हा अपक्ष उमेदवार होता, अवैध ठरवला गेला असल्यामुळे चिन्ह वाटपाची गरज नाही असे आयोगाला पाठवलेल्या पत्रात म्हण्टले आहे.











