धाराशिव – समय सारथी
तत्कालीन मुख्याधिकारी हरीकल्याण यलगट्टे, वसुधा फड व सूरज बोर्डे धाराशिव यांनी त्यांच्या कार्यरत कालावधीमध्ये झालेल्या गैरव्यवराबाबत वरिष्ठ आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्याची मागणी आमदार सुरेश धस यांनी नगर विकास विभागाच्या प्रधान सचिवाकडे केली आहे.
हरीकल्याण यलगट्टे हे धाराशिव येथे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांच्या कार्यकाळात केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत शासनाने त्यांच्या संपूर्ण कार्यरत कालावधीचे लेखापरीक्षण करणे बाबतचे आदेश दिलेले आहेत. यलगट्टे हे या लेखापरीक्षण पथकास सहकार्य करण्याच्या ऐवजी काही महत्त्वाच्या फाईली ते स्वतः घेऊन गेलेले आहेत. त्यामुळे लेखापरीक्षण करता येत नाही. उलट त्यांनी यापूर्वी महालेखापाल कार्यालयामार्फत तसेच अंतर्गत लेखापरीक्षण पदकामार्फत लेखापरीक्षण झाले बाबत व पुन्हा नव्याने लेखापरीक्षण करण्याची गरज नाही अशा प्रकारची नोटीस त्यांचे वकिलामार्फत दिली आहे.
भ्रष्टाचार लपविण्यासाठी यलगट्टे यांनी काही महत्त्वाच्या फाईल कार्यालयातून घेऊन गेले तसेच त्या फाईली गायब केले बाबतचे आरोप निवेदनात केले आहेत.लोकसेवकाने कायदयाने दिलेल्या निर्देशाची अवज्ञा करणे करीता भारतीय दंड संहिता कलम 166 अ, क्षति पोहोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने चुकीच्या दस्ताऐवजांची मांडणी सतत करणे.लोकसेवकाने खोटी माहिती पुरविणे, शासन आदेशाचे पालन न करणे.सार्वजनिक अभिलेख कायदा 1993 व महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख कायदा 2005 कलम 4,8,9. सार्वजनिक मालमत्ता क्षति प्रतिबंध कायदा 1948 कलम 3 व 4. शासनाच्या ध्येय धोरणाविरुध्द कामे करणे याअंतर्गत कारवाई करावी अशी मागणी केली आहे.












