यावर झाली ‘चर्चा’, अहवालानंतर ठरणार कामांची ‘दिशा’ – अधिकारी चौकशीच्या रडारवर
धाराशिव – समय सारथी
धाराशिव शहरातील 140 कोटी रुपयांच्या 59 रस्ते कामात राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. यां बैठकीला राज्याचे परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थितीत होते.
140 कोटी रुपयांच्या कामात बीड कॅपिसिटी व बीड व्हॅलिडिटी यासह अन्य मुद्याच्या अनुषंगाने नगर विकास विभागाचा स्वयंस्पष्ट अहवाल मागितला असल्याची माहिती आहे. यासाठी नगर विकास सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. तत्कालीन मुख्याधिकारी वसुधा फड, विद्यमान मुख्याधिकारी नीता अंधारे यांच्या अनुषंगाने त्यांची भुमिका व त्यांनी घेतलेल्या निर्णयाची तपासणी व चौकशी होणार आहे. यां टेंडर कामात अधिकारी ‘रडारवर’ आल्याचे समजते.
140 कोटी रुपयांची रस्ते कामे बाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची स्वतंत्र बैठक झाली. बैठकीत रस्ते कामाचा आढावा, कोणती कामे याबाबत नियोजन व अपेक्षित चर्चा होऊन निर्णय झाला.
राज्य स्तरीय समितीने 23 मेच्या बैठकीत बीड कॅपिसिटी, बीड व्हॅलिडिटी यासह अन्य मुद्दे उपस्थितीत करीत फेरनिविदा काढण्याची शिफारस केली होती, त्यानंतर 18 सप्टेंबर रोजी बैठकीत पुन्हा याबाबत नियम व कागदपत्रे पाहून मुख्याधिकारी यांनी कार्यादेश देण्याचा निर्णय घ्यावा अशी शिफारस केली होती, 16 ऑक्टोबर रोजी मुख्याधिकारी अंधारे यांनी ठेकेदार अजमेरा यांना काम दिले, त्यानंतर 28 ऑक्टोबर रोजी राज्य सरकारने स्थगिती दिली.












