धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात ड्रग्जचा सुळसुळाट सुरु असल्याचे समोर आले असुन धाराशिव पोलिसांनी परंडा येथे कारवाई करीत 20 पुड्या ड्रग्ज जप्त करीत एका आरोपीला अटक केली आहे. यापुर्वी तुळजापूर व परंडा येथे ड्रग्ज रॅकेट उघड झाले होते त्यानंतर आता परंडा येथे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याने याची पाळेमुळे खोलवर असल्याचे दिसते. पोलिस अधीक्षक रितु खोखर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
परंडा पोलिसांनी परंडा ते मुंगशी जाणाऱ्या रोडवर गफार मुजावर यांच्या शेताजवळ कारवाई करीत गारभवानी इंदिरा नगर झोपडपट्टी येथील बालाजी नवनाथ सोनवने याला अटक केली. पोहेकॉ नितीन प्रकाशराव गुंडाळे यांच्या फिर्यादीवरून कलम 8 (क), 21 (ब) गुंगीकारक औषधीद्रव्ये व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
पोलिसांनी 20 पॉलीथिनीची पिशवी त्यामध्ये 14.5 ग्राम एम डी ड्रग्ज पावडर जप्त केली असुन 15 हजार प्रती ग्रामनुसार 2 लाख 17 हजार किमंत आहे. पोलिस निरीक्षक चोरमले यांच्या आदेशाने तपास पीएसआय खरात करीत आहेत.











