मोदीमुळे आलो म्हणायचे, मोदीपेक्षा जास्त फरकाने निवडुन आलो – हा ठाकरेंचा बालेकिल्ला
धाराशिव – समय सारथी
माय बाप जनतेचा आशीर्वाद आहे आणि लोकांच्या संपर्कात राहिल्यावर लोक काय चमत्कार घडवू शकतात याचे हा निकाल मूर्तिमंत उदाहरण आहे. मागच्या वेळी मला कायम बोललं जायचं की मोदीमुळे निवडून आलात, मला आवर्जून सांगायचं आहे की 1 लाख 27 हजार इतक्या मतांनी मी निवडून आलो होतो. हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मानणारा हाडाचा शिवसैनिक सोबत आहे, हे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे, मोदी पेक्षा जास्त मतांनी मी निवडून आलो. ज्या पद्धतीने शिवसेना पक्ष फोडून पक्ष व चिन्ह हिरावून घेतला गेला त्या गद्दार लोकांना व भाजपला जनतेने 3 लाख 30 हजार रुपयाचा हाबाडा आहे अशी टीका ओमराजे निंबाळकर यांनी केली.
मायबाप जनतेच्या आशीर्वादामुळे आलो आहे,त्यामुळे माजी जबाबदारी आणखी वाढली आहे. ज्यांनी मतदान केले त्यांच्या सोबतच मी ज्यांनी मतदान केले नाही त्यांचा सुद्धा आहे, मी जनतेची कामे करण्यासाठी कटिबद्ध आहे, मी सगळ्याचा आहे कामे करणार. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, वाढलेली महागाई, बेरोजगारी, मराठा व इतर समाजाचे आरक्षण, केंद्र सरकारने वाढवलेले दर याबाबत आवाज उठवणार आहे. कांदा सोयाबीनचे भाव निर्यातबंदी करुन कमी केले गेले व शेतकरी याच्यावर अन्याय झाला. शेतकरी यांचं जगणं केंद्र सरकारला मान्य नाही त्यामुळे तो वैतागला आहे. लोकसभा झांकी है, पिक्चर अभी बाकी है असे सांगत ओमराजे यांनी विधानसभासाठी दंड थोपटले आहेत.
लोकसभा ही विधानसभेची नांदी, लोकसभा ट्रेलर आहे ऑक्टोबर महिन्यात खऱ्या अर्थाने पिक्चर दिसून येईल. महाराष्ट्राच्या विधानसभेत यापेक्षा अधिक यश दिसून येईल. ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांचे मंत्रिपद हिरावून घेतले गेले त्याचा बदला महाराष्ट्राची जनता विधानसभा निवडणुकीत घेईल व परत एकदा महाविकास आघाडी सरकार राज्यात येईल असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
सर्वसामान्य शेतकरी यांच्यावर मोदी यांनी अन्याय केला. महागाई बेरोजगारी हे मुद्दे महत्वाचे ठरले, धाराशिव हा फक्त हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा बालेकिल्ला आहे हे या निकालातून देशाला व ज्यांनी इथे सभा घेतली त्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जनतेने दाखवून दिले आहे. आम्ही विधानसभा तयारी सुरु केली असुन येत्या काही दिवसात बैठका व मेळावे याचे सत्र सुरु होईल असे आमदार पाटील म्हणाले.
भाजपला सांगा, मोदीपेक्षा जास्त मताच्या फरकाने आले – मकरंद राजे निंबाळकर
धाराशिव शहरात तब्बल 17 हजार पेक्षा जास्त मताधिक्य मिळाले आहे.भाजप नेते कार्यकर्ते म्हणायाचे की ओमराजे मोदी लाटेवर निवडून आले आहेत पण त्यांना सांगायचं आहे की मोदी यांच्या पेक्षा जास्त मतांच्या फरकाने ओमराजे निवडून आले आहेत. शिवसेना व ठाकरे कुटुंब काय आहे हे आजच्या निवडणुकीने दाखवून दिले आहे. ही निवडणुक जनतेने हाती घेतली होती, धनशक्ती विरोधात लोक एकवटले होते त्याचे हे यश आहे.