कसाय दणका 2 – बाळा.. नादी लागु नको, बदाबदा बडवीन गाण्यावर ठेका, दंड थोपटले
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील नगर परिषद, जिल्हा परिषद निवडणुकीत यश मिळविल्यानंतर मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पुन्हा एकदा खासदार ओमराजे निंबाळकर यांना खुले चॅलेंज दिले आहे. विरोधकांचा बाजार उठला असुन आगामी विधानसभा, लोकसभा निवडणुकीत भाजप महायुतीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील. नगर परिषद निकालानंतर मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना चॅलेंज दिले होते ते त्यांनी पुर्ण करून दाखविले.
नगर परिषदेच्या विजयानंतर भाजपच्या प्रत्येक कार्यकर्ताची इच्छा होती की जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवावा त्यानुसार झेंडा फडकवीला. महायुतीची जिल्ह्याची टीम चांगली असुन ती पुर्ण ताकतीने काम करेल व सर्व जागावर यश मिळवेल. मी नगर परिषद निवडणुकीवेळी सांगितले होते की जिल्हा परिषदेत सत्ता येणार त्यानुसार सत्ता आली. आता येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत महायुतीची सत्ता आल्याशिवाय मल्हार पाटील शांत बसणार नाही असे ते म्हणाले.
कसाय दणका 2 असा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला तसेच रडू नको बाळा.. नादी लागु नको, बदाबदा बडवीन गाण्यावर ठेका धरत मल्हार पाटील यांनी दंड थोपटले.
नगर परिषद निवडणुकीच्या निकालात मिळालेल्या यशानंतर मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर निशाणा साधता जोरदार टीका केली होती. धमक असेल तर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पदाची निवडणूक जिंकून दाखवा, मल्हार पाटील नाव बदलतो असे ओपन चॅलेंज दिले आहे. माज उतरवण्याची भाषा करणाऱ्यांचा जनतेनेच उत्तर देत माज उतरवला. लोकसभेतील विजयाचा ‘राक्षसी आनंदा’ घेतला मात्र जनतेचं उत्तर दिले.
लोकसभेच्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर आणि एका विशिष्ट समाजाच्या मतांवर माझ्या माऊलीला पराभूत केल्याचा अतिशय राक्षसी आनंद खासदाराला झाला होता. मात्र त्या आनंदाला आता जनतेनेच उत्तर दिले असून, त्याची खरी औकात मायबाप जनतेने दाखवून दिली आहे, असा घणाघाती टोला मल्हार पाटील यांनी लगावला होता.











