धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा नियोजन समितीची बैठक आज 3 जानेवारी रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली होणार असुन ही बैठक ऑनलाईन व्हीसीद्वारे सकाळी 11 वाजता सुरु होणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा सचिव किर्ती किरण पुजार यांनी कळविले आहे. आजच्या बैठकीत 25-25 वर्षातील डिसेबर 25 अखेर खर्चाचा आढावा घेणे. 26-27 च्या आराखडयास मान्यता देणे व 25-26 च्या पुर्नविनियोजन प्रस्तावास मान्यता देणे हे विषय असणार असुन आयत्या वेळी आलेल्या विषयावर चर्चा होणार आहे.
जिल्हा नियोजन समिती 2024-25 वर्षाच्या 268 कोटी पैकी 22 कोटींच्या कामावरील स्थगिती उठवली होती व कार्यारंभ आदेश न दिलेल्या सर्व कामांची प्रशासकीय मान्यता रद्द केली होती. जवळपास 246 कोटींच्या कामाच्या प्रशासकीय मान्यता रद्द करण्यात आल्या असुन त्यातील काही कामे गरज असल्यास 2025-26 मध्ये पुन्हा प्रशासकीय मान्यता घ्यावी असे 15 ऑक्टोबर रोजी झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत ठरले होते. 2024-25 मध्ये वितरीत करण्यात आलेला निधी 31 मार्च 2026 पर्यंत खर्च करणे आवश्यक राहील असे स्थगिती उठवताना जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या आदेशात नमुद केले होते.
जिल्हा नियोजन समितीच्या 24-25 वर्षाच्या 268 कोटी रुपयांच्या कामांना भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या तक्रारी नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती त्यानंतर ती ठेवली आहे.2025-26 या चालू आर्थिक वर्षासाठी 457 कोटी रुपयांच्या आराखड्याला मान्यता मिळालेली आहे.












