धाराशिव – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत हे उद्या 18 जुलै रोजी गुरुवारी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी 11.30 वाजता जिल्हा नियोजन समितीची बैठक होणार असुन त्यानंतर ते विविध कार्यक्रम, आढावा बैठक घेतील. विधानसभा निवडणुक आचारसंहितापुर्वी ही बैठक होणार असल्याने महत्वाची मानली जाते. या बैठकीला खासदार, आमदार व निमंत्रित सदस्य उपस्थितीत असणार आहेत.
जिल्हा नियोजन समितीत 8 जानेवारी रोजी झालेल्या विषयांना मान्यता देणे, जिल्हा नियोजन समितीच्या 2023-24 च्या खर्चास मान्यता देणे, सन 2024-25 च्या निधीचे नियोजन व आढावा हे महत्वाचे विषय असणार असुन अध्यक्ष डॉ सावंत यांच्या परवानगीने आयत्या वेळी अन्य विषयावर चर्चा होणार आहे.
दुपारी 1.10 वाजता पालकमंत्री डॉ सावंत हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जिल्हाधिकारी कार्यालयात सखोल आढावा बैठक घेतील. दुपारी 2 ते 5 ही वेळ पालकमंत्री यांनी राखीव ठेवली आहे. ते सकाळी 11 वाजता धाराशिव येथील पालकमंत्री कार्यालयात येतील त्यानंतर डीपीसी बैठक. जिल्हा नियोजन समिती बैठकीनंतर दुपारी 2 वाजता पालकमंत्री डॉ सावंत यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक नुतन इमारत व 244 सदनिका प्रकल्पचे उदघाटन होणार आहे.