धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर नवा रेल्वेमार्ग – बीडमध्ये बैठक संपन्न
धाराशिव – समय सारथी
धाराशिव, बीड ते छत्रपती संभाजीनगर नवा रेल्वेमार्ग प्रस्तावित असुन मराठवाड्यासाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतल्याबद्दल केंद्र सरकारचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आभार मानले आहेत. डॉ पद्मसिंह पाटील यांच्या मागणीमुळे पहिले सर्व्हेक्षण झाले असा दावा करीत पुढे स्वतःच्या पाठपुरावा केल्यामुळे यश मिळाले असे आमदार पाटील यांनी पोस्ट केले आहे. रेल्वे मंत्रालयाने आता हा नवा रेल्वेमार्ग प्रस्तावित केला आहे. याबाबत बीड जिल्हाधिकारी कार्यालयात दोन दिवसांपूर्वीच बैठक झाली, त्यानंतर आमदार पाटील यांनी हे रेल्वे काम आपल्यामुळे होत असल्याचा हा दावा केला आहे.











