धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा विधीज्ञ संघाच्या वार्षिक निवडणुकीत अध्यक्षपदी ऍड अमोल सुरेशराव वरुडकर हे 64 मतांनी विजयी झाले, त्यांना 648 पैकी 269 मते पडली. विरोधी उमेदवार ऍड सचिन गुरव यांना 205, ऍड विष्णु डोके यांना 158 इतकी मते पडली. उपाध्यक्षपदी ऍड नितीन शिवाजीराव लोमटे 497 मते व ऍड प्रमोद वाकुरे यांना 397 मते घेऊन विजयी झाले तर ऍड इंद्रजीत शिंदे यांना 65 व ऍड मुकुंद सस्ते यांना 213 मते पडुन ते पराभूत झाले. सचिव ऍड अनिकेत अविनाश देशमुख, सहसचिव म्हणुन ऍड भाग्यश्री रणखांब, कोषध्यक्ष ऍड नारायण पाटील, महिला प्रतिनिधी ऍड उज्वला इंगळे हे बिनविरोध झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणुन ऍड कैलास तानाजी बागल, ऍड निलेश दत्तात्रय बरखेडे पाटील, ऍड अजय विजय पाटील यांनी काम पाहिले. मतमोजणीसाठी ऍड मिलींद देशमुख, ऍड प्रितेश उंबरे, ऍड एश्वर्या पडवळ, श्रीदेवी बळे- मुसळे यांनी सहकार्य केले. निवडणुक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.