धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलनाचा वनवा पेटला असुन धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक व भुम येथील गोलाई चौक येथे चक्काजाम आंदोलन सुरूच आहे. रात्रभर तरुणांनी जागत आंदोलन सुरु ठेवले असुन भजन कीर्तन करीत रात्रभर मराठा आंदोलक जागले आहेत. बैलगाडा घेऊन आंदोलक सहभागी झाले आहेत. मराठा आरक्षण अंमलबजावणी व जारांगे यांच्या समर्थनार्थ तरुण रस्त्यावर उतरला आहे.
धाराशिव जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी रस्ता रोको, गाव व शहर बंदची हाक देण्यात आली असुन अनेक ठिकाणी काल जाळपोळ, बसवर दगडफेक करण्यात आली आहे, त्यामुळे हे आंदोलन आक्रमक व उग्र स्वरूप घेत आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्शवभुमीवर धाराशिव जिल्ह्यातील बससेवा बंद करण्यात आली असुन पुढील आदेश येईपर्यंत बससेवा बंद राहणार आहे. प्रवाशी यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काल काही बसवर दगडफेक करण्यात आल्या नंतर प्रशासनाने बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. धाराशिव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील बस सेवा बंद राहणार आहे.