Samay Sarathi
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
  • ई-पेपर
  • वेब स्टोरीज
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात
No Result
View All Result
Samay Sarathi
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

धाराशिव विमानतळ होणार विकासाचे ‘रीजनल हब’ – मुख्यमंत्र्यांचे मोठे सहकार्य : आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती

समय सारथी by समय सारथी
December 31, 2025
in महाराष्ट्र
0
0
SHARES
560
VIEWS

धाराशिव – समय सारथी

धाराशिव विमानतळ आता केवळ फ्लाइंग ट्रेनिंगपुरते मर्यादित न राहता मेंटेनन्स-रिपेअर-ओव्हरहॉल (MRO) प्रकल्प ,पार्किंग सुविधा व प्रवासी सेवे बरोबर कृषी निर्यात कार्गो टर्मिनलसह बहुउद्देशीय विमानतळ म्हणून विकसित होणार आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे मोठी औद्योगिक गुंतवणूक, कृषी मालाची थेट हवाई निर्यात, मोठ्या प्रमाणात रोजगारनिर्मिती आणि पर्यटन विकासाला भरीव चालना मिळणार आहे. भविष्यात धाराशिव विमानतळ प्रादेशिक हवाई वाहतुकीचे महत्त्वाचे केंद्र (Regional Hub) म्हणून उभे राहील, असा ठाम विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस धाराशिव विमानतळावर आले असता, त्यांच्याकडे विमानतळाच्या धावपट्टी विस्ताराची अत्यंत ठोस आणि वस्तुनिष्ठ मांडणी करण्यात आली होती. या मागणीचे महत्त्व ओळखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कोणताही विलंब न करता त्याच क्षणी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (MADC) व्यवस्थापकीय संचालक (MD) श्रीमती स्वाती पांडे यांना दूरध्वनीवरून सविस्तर, तांत्रिक आणि व्यवहार्य प्रस्ताव तयार करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते.त्यानंतर हिवाळी अधिवेशनात या अनुषंगाने आपण संबंधित अधिकाऱ्यांची नागपूर येथे बैठक देखील घेतली होती.मुख्यमंत्री महोदयांच्या या निर्णयक्षम आणि तत्पर नेतृत्वामुळेच आपल्या मागणीला मंजुरी मिळून प्रत्यक्ष स्वरूप प्राप्त होत असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले आहे.

धाराशिव विमानतळ धावपट्टी विस्तार केल्याने १,२१८ मीटर लांबीची धावपट्टी वाढवून आता ३५०० मीटर होत आहे. त्यासाठी केलेला पाठपुरावा कामी आला आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार केंद्र सरकारच्या उडान योजनेअंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आपले विमानतळ हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय झाला आहे. त्यामुळे भविष्यातील प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असून आपल्या पाठपुराव्याला यश आले असल्याची माहितीही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे. धाराशिव विमानतळाच्या धावपट्टीची रुंदीही ३० मीटरवरून ४५ मीटर होणार आहे. धावपट्टीची मजबुती (PCN) १० वरून ६० पर्यंत वाढवण्यात येणार आहे. यामुळे बोईंग ७३७, बोईंग ७७७, एअरबस ३२० व ३२१ सारखी मोठी व्यावसायिक विमाने धाराशिव येथे उतरण्यास सक्षम होतील. आपल्या विमानतळाचे क्षेत्रफळही आता वाढविले जाणार आहे. 

धाराशिवच्या विकासाला नवे पंख

धाराशिव जिल्ह्याच्या दळणवळण, औद्योगिक आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने विमानतळ विस्ताराचा निर्णय मैलाचा दगड ठरणार आहे. प्रवासी विमानसेवा सुरू झाल्याने धाराशिवचा देशातील प्रमुख शहरांशी थेट संपर्क प्रस्थापित होणार असून जिल्ह्याच्या व्यापार, पर्यटन आणि गुंतवणुकीला चालना मिळणार आहे. प्रस्तावित MRO (मेंटेनन्स, रिपेअर अँड ओव्हरहॉल) सुविधांमुळे विमान दुरुस्ती क्षेत्रात मोठी गुंतवणूक आकर्षित होणार असून तांत्रिक व कुशल युवकांसाठी रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच कृषी निर्यात कार्गो टर्मिनल उभारल्याने शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट हवाई मार्गे देश-विदेशात पोहोचेल, ज्यामुळे शेतीमालाला योग्य दर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

या सर्व सुविधांचा एकत्रित परिणाम म्हणून धाराशिव विमानतळ केवळ जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण मराठवाड्याच्या विकासाचा ‘गेमचेंजर’ ठरेल, असा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला. हा निर्णय म्हणजे केवळ विमानतळाचा विस्तार नसून धाराशिवच्या आर्थिक, औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या दिशेने टाकलेले ठोस व दूरदृष्टीपूर्ण पाऊल असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Previous Post

5 हजारांची लाच – ऍट्रॉसिटी अर्थसाह्याचा हप्ता मंजूर करण्यासाठी – समाजकल्याण कार्यालयातील कनिष्ठ लिपिक जाळ्यात

Next Post

दारू नको, दुध प्या – धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचा जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम

Related Posts

महाराष्ट्र

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026
महाराष्ट्र

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026
महाराष्ट्र

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
महाराष्ट्र

शासन निधीत अपहार, गुन्हा नोंद – काम न करता लाटले 7 लाख, ठेकेदार व अधिकारी सहभागी

February 19, 2026
महाराष्ट्र

पाठराखण – अर्चना पाटीलांचं काम पहा, त्या कर्तृत्ववान.. घराणेशाही सगळीकडे, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा टोला

February 19, 2026
महाराष्ट्र

उबाठा गटाला मोठा धक्का बसणार – भुम तालुक्यात नाराजीचा सुर, निर्णयाच्या तयारीत

February 18, 2026
Next Post

दारू नको, दुध प्या - धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानचा जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

सर्वाधिक पसंतीचे

  • आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    आदेश – गुन्हा नोंद करण्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांचे तहसीलदारांना आदेश 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांच्या गँगचा धाराशिवमध्ये धुमाकुळ – 8 ते 10 सशस्त्र लोक CCTV मध्ये कैद, पोलिस दाखल… पहा व्हिडिओ 

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking – तुळजापूर ड्रग्ज तस्करीत अखेर मास्टर माईंडला केले आरोपी – गंगणे, कणेसह 12 आरोपी वॉन्टेड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दरोडेखोरांचा पुन्हा धुमाकुळ, 5 जणांची सशस्त्र टोळी CCTv मध्ये कैद, सोने चोरून थुकून गेले – धाराशिव पोलिसांना आव्हान

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वीज पडुन एक तरुण ठार, धाराशिव जिल्ह्यातील घटना

    0 shares
    Share 0 Tweet 0

ताज्या बातम्या

जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कामाची जागतिक पातळीवर दखल – सांगली जिल्ह्यात राबवलेल्या पंधरा नाविन्यपूर्ण उपक्रमांचा समावेश

February 21, 2026

फिलगुडी शॉपचे लोकार्पण – श्रीसिद्धीविनायक परिवाराचे नवे पाऊल

February 20, 2026

अमिषाला बळी पडणार नाही – आम्ही महायुती सोबत, सत्तेचे समीकरण, राष्ट्रवादीची भुमिका

February 19, 2026
February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • ई-पेपरNew
  • वेब स्टोरीजNew
  • आमच्या विषयी
  • संपर्क
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
  • जाहिरात

© 2023 .

No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • देश
  • महाराष्ट्र
    • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • विदर्भ
    • मराठवाडा
    • उत्तर महाराष्ट्र
    • कोकण
  • राजकारण
  • प्रशासन
  • गुन्हेगारी जगत
  • इतर
    • इतर
    • परांडा
    • धाराशिव
    • पुणे
  • जाहिरात

© 2023 .

error: Content is protected !!
Manage Cookie Consent
To provide the best experiences, we use technologies like cookies to store and/or access device information. Consenting to these technologies will allow us to process data such as browsing behavior or unique IDs on this site. Not consenting or withdrawing consent, may adversely affect certain features and functions.
Functional Always active
The technical storage or access is strictly necessary for the legitimate purpose of enabling the use of a specific service explicitly requested by the subscriber or user, or for the sole purpose of carrying out the transmission of a communication over an electronic communications network.
Preferences
The technical storage or access is necessary for the legitimate purpose of storing preferences that are not requested by the subscriber or user.
Statistics
The technical storage or access that is used exclusively for statistical purposes. The technical storage or access that is used exclusively for anonymous statistical purposes. Without a subpoena, voluntary compliance on the part of your Internet Service Provider, or additional records from a third party, information stored or retrieved for this purpose alone cannot usually be used to identify you.
Marketing
The technical storage or access is required to create user profiles to send advertising, or to track the user on a website or across several websites for similar marketing purposes.
Manage options Manage services Manage {vendor_count} vendors Read more about these purposes
View preferences
{title} {title} {title}

WhatsApp us

Join On WhatsApp