धाराशिव – समय सारथी
नववर्षाच्या पूर्वसंध्येला दारू नको दूध प्या असा नारा देत धाराशिव शहरातील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठानने जनजागृतीचा स्तुत्य उपक्रम राबवीला.
सरत्या वर्षाचा शेवटचा दिवस असल्याने शहरात गावागावात थर्टी फर्स्टच्या नावाखाली अनेकजण दारूच्या पार्ट्या करताना दिसत आहेत.. दारू पिऊन लोकांचे तरुणांचे अपघात होतात अनेक वाईट घटना घडत असतात याला आळा बसावा म्हणून धाराशिव मधील धर्मवीर संभाजी महाराज प्रतिष्ठान च्या वतीने” दारू नको दूध प्या” असा उपक्रम राबवून शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात लोकांना मोफत दुध वाटप करण्यात आले. या उपक्रमाला अनेक तरुणांनी,लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने सर्वत्र या उपक्रमाचं कौतुक होताना दिसत आहे.












