धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभा मतमोजणीत ओमराजे यांना 3 लाख 29 हजार 846 मतांची आघाडी मिळाली असुन त्यांना विजयी घोषित करण्यात आले आहे. महाविकास आघाडीचे शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांना 7 लाख 48 हजार 752 इतकी मते मिळाली आहेत तर महायुतीच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार अर्चना राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 18 हजार 906 इतकी मते मिळाली आहेत. वंचितचे भाऊसाहेब आंधळकर यांना 33 हजार 402 इतकी मते मिळाली आहेत. ओमराजे यांना सर्वच्या सर्व विधानसभा मतदार संघात व सर्व 30 फेऱ्यात आघाडी मिळाली आहे. शिवसेना उबाठा ओमराजे निंबाळकर यांना 58.38 % मते तर राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना 32.66 % मते पडली.
पहिल्या फेरीत 12 हजार 566, दुसऱ्या फेरीत 13 हजार 903, तिसरी फेरीत 11 हजार 365, चौथी फेरीत 15 हजार 841, पाचवी फेरीत 9 हजार 479, सहावी फेरीत 14 हजार 164, सातवी फेरीत 10 हजार 394, आठवी फेरीत 12 हजार 7, नववी फेरीत 12 हजार 647, दहावी फेरीत 14 हजार 387, अकरावी फेरीत 13 हजार 358, बाराव्या फेरीत 11 हजार 656, तेराव्या फेरीत 13 हजार 467, चौदावी फेरीत 14 हजार 166, पंधरावी फेरीत 14 हजार 166, सोळावी फेरीत 11 हजार 824, सतरावी फेरीत 11 हजार 957, अठरावी फेरीत 16 हजार 733, एकोणीस फेरीत 11 हजार 728, वीसव्या फेरीत 11 हजार 261, एकेवीस फेरीत 10 हजार 954, बावीस फेरीत 9 हजार 751, तेवीसाव्या फेरीत 10 हजार 572, चोवीसव्या फेरीत 10 हजार 99, पंचेवीस फेरीत 8 हजार 752, 26 व्या फेरीत 8 हजार 510, 27 व्या फेरीत 5 हजार 45, 28 व्या फेरीत 3 हजार 889, 29 व्या फेरीत 2 हजार 55 व 30 व्या अखेरच्या फेरीत 260 मतांची लीड मिळाली
धाराशिव लोकसभेतील 8 आमदार ( मंत्री तानाजीराव सावंत, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, ज्ञानराज चौगुले, अभिमन्यू पवार, राजाभाऊ राऊत, शिक्षक आमदार विक्रम काळे, पदवीधर आमदार सतीश चव्हाण, स्थानिक स्वराज संस्था आमदार सुरेश अण्णा धस ) व इतर पक्षातून आलेले अनेक स्थानिक नेते, माजी आमदार हे महायुतीच्या बाजूने तर महाविकास आघाडीकडे धाराशिवचे एकमेव आमदार कैलास पाटील व इतर नेते होते. सर्व दिग्गज आमदार विरुद्ध ओमराजे निंबाळकर व महाविकास आघाडी अशी ही रंजक लढत अखेर एकतर्फी झाली.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 लाख 86 हजार 238 पैकी 12 लाख 4 हजार 832 इतके 63.87 टक्के मतदान झाले त्यात शिवसेनेचे ओमराजे निंबाळकर यांना 5 लाख 96 हजार 640 व राष्ट्रवादीचे उमेदवार राणाजगजीतसिंह पाटील यांना 4 लाख 69 हजार 74 इतके मतदान मिळाले होते, ओमराजे हे 1 लाख 27 हजार 566 मतांनी विजयी झाले होते. ओमराजे निंबाळकर यांना 49.5 टक्के तर राणाजगजीतसिंह पाटील यांना 38.9 टक्के मते मिळाली होती.