धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी या जोडीने अवैध कत्तलखाने व गोमांस विरोधी मोहीम हाती घेतली आहे. “बुलडोजर बाबा” जोडीने आज धाराशिव व परंडा शहर अश्या दोन ठिकाणी एकाच वेळी अवैध कत्तलखाने जमीनधोस्त करण्याची कारवाई केली. महसूल, पोलीस व नगर परिषद प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात काही कत्तलखाने जेसीबीच्या साहाय्याने पाडले.
धाराशिव व परंडा शहरातील कत्तलखाने जमीनधोस्त केले असुन इमारतीचे बांधकाम,पत्र्याचे शेड काढून टाकण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तात ही कारवाई करण्यात आली आहे, आजवरची ही सगळ्यात मोठी एकाच वेळीची कारवाई असुन बांधकामे जेसीबीने पाडण्यात आली आहेत.
कत्तलखाने पाडण्यापुर्वी अतिक्रमण काढून घ्यावे अशी नोटीस दिली होती त्यानंतर कारवाई करण्यात आली, आगामी काळात सुद्धा कट्टलखाने यांची माहिती घेऊन कायदेशीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी ओम्बासे व पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
धाराशिव येथील कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील राठोड, तहसीलदार शिवानंद बिडवे, मुख्याधिकारी वसुधा फड,पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, एपीआय महेश क्षीरसागर, पठाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांनी केली तर परंडा शहरातील कारवाई यांनी केली. अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी सशस्त्र बंदोबस्त ठेवला होता.