धाराशिव – समय सारथी
एकच ध्यास भुम परंडा वाशीचा सर्वांगीण विकास असा ध्यास घेत पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी करोडो रुपयांची विकास कामे केली आहेत. सिंचन, आरोग्य, रस्ते, उद्योग यासह अन्य क्षेत्रात महत्वाचे निर्णय घेत करोडो रुपयांची विकास कामे झाल्याने या भागात अमुलाग्र असे बदल झाले आहेत. विकास कामासोबत सामुदायिक विवाह सोहळे, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबाला आर्थिक आधार देत शिक्षणाची जबाबदारी घेऊन पालकत्व स्वीकारून मंत्री सावंतव्यानी सामाजिक दायित्व सुद्धा पुर्ण केले आहे. सावंत यांनी गेल्या 5 वर्षात अनेक कामे करुन इथल्या भागातील विकास करण्याचा ध्यास घेतला आहे.
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी केलेल्या विकास कामामुळे या भागातील दुष्काळाचा कलंक पुसण्यास मदत झाली असुन गतिमान रस्ते, वेगवान विकास, सिंचनाची समृद्धी म्हणजे विकासाचा सावंत पॅटर्न असेच म्हणावे लागेल. ग्रामीण भागात शिक्षणाची सोयव्हावी यासाठी शाळांना डिजिटल बोर्ड दिले तर गाव तिथे स्मशानभुमी व दफनभुमी योजना राबविली. रस्ते प्रगतीचा मार्गदर्शन असल्याने सिमेंट रस्ते, पेव्हर ब्लॉक कामे केली. आरोग्य क्षेत्रात न भुतो न भविष्यती असे काम करुन त्यांनी इथल्या आरोग्य सुविधेचा दर्जा सुधारला.
जनता दरबारच्या माध्यमातून शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवून त्यांना धीर दिला, जिथे प्रशासन दाद देत नव्हते तिथे सावंत यांनी अधिकाऱ्यांची कान उघडणी करुन सामान्य लोकांचे प्रश्न सोडवित न्याय दिला. महाआरोग्य शिबिराच्या माध्यमातून सावंत यांनी आरोग्य तपासणी शिबीर घेऊन आरोग्यची काळजी देखील घेतली.