धाराशिव – समय सारथी
जीवन हे क्षणभुंगर असल्याचे नेहमीच बोलले जाते मात्र त्याचा प्रत्यय धाराशिव येथे एका कार्यक्रमात आला, कॉलेजमधील निरोप समारंभाचे भाषण करताना मुलीला चक्कर आली आणि हसत खेळता झालेला तीच मृत्यू कॅमेरात कैद झाला. वर्षा खरात असे त्या वीस वर्षीय मुलीचे नाव आहे. चक्कर आल्यावर तिला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता मुलीला मृत घोषित करण्यात आले. रा गे शिंदे कॉलेज परंडा येथे ही घटना घडली, घटनेने महाविद्यालयासह शहर परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आहे.