धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची माजी आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांची भेट घेतली. मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली त्यात तब्बल दोन तास चाललेल्या चर्चेत अनेक राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा झाली. आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांनी स्वतः आपल्या अधिकृत फेसबुक पेजवरून या भेटीची माहिती दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तातडीने भेटीचा निरोप आल्याने आपण तात्काळ मुंबई गाठून त्यांची भेट घेतल्याचे सावंत यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
या भेटीदरम्यान राज्याच्या विकासाचे विविध मुद्दे आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर सखोल चर्चा झाल्याची माहिती सावंत यांनी दिली.