धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी माजी आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांची पुणे येथील निवासस्थानी जात सदिच्छा भेट घेतली. सावंत यांची प्रकृती खराब असल्याने ते काही काळ आराम करीत होते, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी शिंदे हे सावंत यांच्या घरी आले असल्याची माहिती आहे. शिंदे सावंत यांच्या भेटीने अनेक राजकीय समीकरणे मांडली जात आहेत.
मंत्रीपद न मिळाल्याने सावंत हे नाराज असल्याची चर्चा होती, विधानसभा निकाल नंतर सावंत गेली 9 महिन्यापासुन भुम परंडा वाशी मतदार संघात आलेले नाहीत, शिंदे यांच्या भेटीनंतर सावंत सक्रीय होणार असल्याचे बोलले जात आहे. राज्य मंत्री मंडळ विस्तारात सावंत यांना पुन्हा मंत्रीपद मिळेल अशी अशा यानिमित्ताने कार्यकर्त्यांत पल्लवीत झाली आहे. उपमुख्यमंत्री शिंदे यांचे सावंत परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करीत स्वागत करण्यात आले.
धाराशिव येथे शिवसेनेच्या आढावा बैठकीच्या बॅनरवर माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा फोटो नसल्याने सावंत समर्थक आक्रमक झाले त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली, शिवसेनेचे धाराशिव समन्वयक राजन साळवी यांनी समजूत काढल्याने वाद मिटला. सावंत समर्थक सक्रीय झाल्याने व त्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांची भेट घेतल्याने राजकीय घडामोडी घडणार आहेत.