धाराशिव – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात दुःखद निधन झाले असुन त्यांच्यावर उद्या 29 जानेवारी रोजी बारामती येथील शारदा प्रांगणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शहा यांच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देश, राज्यभरातील नेते उपस्थितीत राहणार आहेत.
उपमुख्यमंत्री पवार यांच्या निधनाने आज राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली आहे तरी 3 दिवस शासकीय दुःखवटा जाहीर केला आहे. देशातील अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे.
धाराशिव तालुक्यातील तेर ही त्यांची सासरवाडी आहे. डॉ पद्मसिंह पाटील यांची बहीण सुनेत्रा यांचे ते पती असुन पाटील परिवारासह जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
अजित पवार यांच्या विमान अपघातस्थळाची पाहणी करण्यासाठी आणि तपास सुरू करण्यासाठी विमान अपघात तपास ब्युरोचे (AAIB) एक पथक दिल्लीहून बारामतीला रवाना झाले आहे.












