बारामती – समय सारथी
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यावर त्यांच्या पार्थिवावर आज शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दादा परत या, ‘अमर रहे’च्या घोषणा देत लाखोच्या जनसमुदायाने त्यांना जड अंत करणाने श्रद्धांजली अर्पण केली. निरोप देताना अजित दादांच्या आठवणीने सगळ्यांचा कंठ दाटून आला.
देशाचे गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह देशभरातील आजी माजी मंत्री, राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बारामती येथे येत श्रद्धांजली अर्पण केली व शरद पवार यांच्यासह कुटुंबाची भेट घेत आधार दिला.












