धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील कामठा येथील एका तरुणाला ऑनलाईन जॉबचे आमिष दाखवुन 18 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. 29 वर्षीय सागर राम साळुंके असे या तरुणांचे नाव असुन तो सध्या धाराशिव शहरातील गणेश नगर या भागात राहायला आला आहे.
फिर्यादी सागर राम सांळुके यांचा मोबाईलवर मोबाईल नंबर 7320982450 च्या व्हाट्सऍप वरुन जॉब संदर्भात मॅसेज आला की टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील त्यासंदर्भातील वेगवेगळे ईकॉनॉमिक टास्क पुर्ण केल्यास जास्त पैसे मिळतील याचे आमिष दाखवून सागर सांळुके यांना वेगवेगळ्या खाते नंबरवर युपीआय आयडीवर पैसे भरण्यास सांगून 27 जुलै ते 2 ऑगस्ट दरम्यान मोबाईल फोनवर बॅक खात्यातुन ऑनलाईन 18 लाख 14 हजार भरले. त्याबद्दल्यात सागर सांळुके यांना कोणतीही रक्कम परतावा मिळाली नसुन त्यांची ऑनलाईन फसवणुक झाली. सागर सांळुके यांनी 9 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 318(1) सह 66 (सी), 66 (डी) माहिती तंत्रज्ञान सुधारणा कायदा 2008 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.