धाराशिव – समय सारथी
खरीप 2022 संदर्भात मंत्रालय मुंबई येथे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीबाबत राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक बोलवण्यात आली होती. भारतीय कृषी विमा कंपनीने विभागीय आयुक्तांच्या विरोधात राज्यस्तरीय तक्रार समितीकडे तक्रार दाखल केली होती त्या अनुषंगाने आजची बैठक बोलवण्यात आली होती. भारतीय कृषी विमा कंपनीचे अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले असुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले असल्याची माहिती शेतकरी नेते अनिल जगताप यांनी दिली.
भारतीय कृषी विमा कंपनीने शेतकऱ्यांना तातडीने पंचनामे द्यावेत, पंचनामातील नुकसान भरपाई प्रमाणे नुकसान भरपाई द्यावी, पूर्व सूचनाचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई द्यावी असे आदेश देण्यात आले त्यामुळे राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीची बैठक धाराशिव जिल्ह्याच्या दृष्टीने यशस्वी झाली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रधान सचिव कृषी विकास रस्तोगी,अवर सचिव सरिता पाटील,आमदार प्रवीण स्वामी, शेतकरी प्रतिनिधी अनिल जगताप, तक्रारदार पद्मराज गडदे तक्रारदार माने, भारतीय कृषी विमा कंपनीचे अधिकारी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाचे सोनटक्के व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कृषी आयुक्त तसेच सांख्यिकी विभागाचे अधिकारी उपस्थित होते