धाराशिव – समय सारथी
अवैध अनधिकृत विना परवाना खत साठा केल्याप्रकरणी धाराशिव जिल्ह्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, कृषि संचालक ( निविष्ठा व गुण नियंत्रण) सुनील बोरकर, विभागीय कृषी सहसंचालक लातूर विभाग लातूर साहेबराव दिवेकर व मुख्य गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक प्रवीण देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने , कृषी विकास अधिकारी प्रमोद राठोड यांच्या नियोजनातून जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय भरारी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात एका शेतकऱ्याच्या कुक्कुटपालन शेड मध्ये विनापरवाना एकूण 456 पोते रासायनिक खत (वजन 20मे. टन) निदर्शनास आल्यामुळे आज पोलीस ठाणे वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिव येथे गुन्हा नोंद करण्यात आला आणि एकूण 4.61 लक्ष रुपये किमतीचा रासायनिक खत साठा जप्त करण्यात आला.
सदरील गुन्ह्याची फिर्याद राजाराम बर्वे, तालुका कृषी अधिकारी वाशी यांनी दिली. सोबत मोहीम अधिकारी डी ए गरगडे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, धाराशिव प्रवीण पाटील, पंचायत समिती वाशी कार्यालयाचे कृषी अधिकारी अविनाश माळी, विस्तार अधिकारी कृषि श्रीकांत साळवे, तालुका कृषी अधिकारी वाशी कार्यालयातील गायकवाड, साखरे हे होते. याकामी प्रवीण विठ्ठल भोर तंत्र अधिकारी गु नि लातूर यांनी सखोल मार्गदर्शन केले.