धाराशिव – समय सारथी
शासकीय कामे मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र वापरून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी भुम तालुक्यातील निपाणी येथील कंत्राटदार रमेश नवनाथ कोकाटे याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने सन 2020 ते 2022 दरम्यान जिल्हा परिषद बांधकाम विभाग, धाराशिव येथे कंत्राट व कंत्राटदार प्रमाणपत्रे मिळवण्यासाठी ‘वर्क डन अॅण्ड वर्क इन हॅण्ड’ ही बनावट प्रमाणपत्रे व इतर खोटी अभिलेख सादर केले. या खोट्या कागदपत्रांच्या आधारे विभागाची फसवणूक करण्यात आली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
उपकार्यकारी अभियंता विवेकराज विलासराव वायचळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलिसांनी रमेश कोकाटे यांच्या विरोधात कलम 420 (फसवणूक), 467, 468, 471 (बनावट कागदपत्रांचा वापर) या कलमान्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.