धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिस दलात कार्यरत असलेल्या एका सहायक पोलिस निरीक्षकावर बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रवींद्र शिंदे असे या पोलिस अधिकाऱ्याचे नाव असुन बंदूकीचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करीत नग्न फोटो व व्हिडीओ काढले व त्याच्याआधारे वारंवार त्रास दिला. पिडीत महिला गर्भवती राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात केल्याचा आरोप फिर्यादीत केला आहे.
पिडीत महिलेला व तीच्या कुटुंबाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन अत्याचार केले जात होते अखेर महिलेने तक्रार दिल्यानंतर बीड शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 64(2), 115(2),351(2)(3),352, शस्त्र अधिनियम 2 व 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बीड पोलिस याचा तपास करीत आहेत.
पिडीता व रवींद्र शिंदे यांची घरे बीड येथे शेजारी असल्याने त्यांची जुनीच ओळख होती. त्यानंतर शिंदे यांची 2011 साली पोलिस खात्यात पोलिस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्यानंतर ते जिल्ह्याबाहेर गेले मात्र पिडीतेशी ते कायम संपर्क करण्याचा प्रयत्न करत होते. 2007 साली पीडितीचे लग्न झाले होते तरी ते संपर्क करायचे. सुरुवातीला 2013 मध्ये रात्रीच्या वेळी बळजबरीने घरात घुसून बंदुकीचा धाक दाखवून अत्याचार केला आणि पिडीतेचे नग्न व्हिडीओ आणि फोटो काढल्याचे फिर्यादी म्हटले आहे.
या प्रकाराविषयी कोणाला सांगीतले तर तुझ्या पतीला खोट्या गुन्ह्यात अडकण्याची धमकीही दिली. वारंवार अत्याचार केल्यानंतर पिडीता गर्भवती राहीली व त्यानंतर बळजबरीने गर्भपात करायला लावला. 2024 साली भुम येथे पीडितेला भाड्याने घर देऊन तिथे मुलासमोर अनैसर्गिक कृत्य, अत्याचार करुन मारहाण केली. त्यानंतर पीडितने 2 वेळेस घरातून निघुन जाण्याचा प्रयत्न केला मात्र मारहाण केली. धाराशिव शहरातील शंकरनगर येथे घरी नेहून अत्याचार केला. 1 जुन रोजी पुन्हा पिडीतेच्या घरात शिरले आणि बळबजरी केली, 1 जुलै रोजी तुला व तुझ्या कुटुंबाला जिवे मारुन टाकण्याची आणि खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचे पिडीतेने शिवाजी नगर पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.