शासकीय कामात अडथळा, जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने सांजा, वरुडा व येडशी येथील आंदोलकावर गुन्हे दाखल
आंदोलक शेतकरी आहे, कसाई नाही – समाज बांधवांचा संतप्त सवाल
धाराशिव – समय सारथी
शेतकऱ्यांसाठी बैल जीव की प्राण, त्याचे शेतकऱ्याशी जिवाभावाचं नातं मात्र याचं बैलांना आंदोलनात क्रूरतेने वागणूक देत वेदना होतील असा छळ केल्याचा आरोप धाराशिव पोलिसांनी केला आहे. नावे शोधत ज्ञात 70 व 140 अज्ञात मराठा आंदोलकावर गुन्हे नोंद केले आहेत. सांजा, वरुडा व येडशी येथील आंदोलक पोलिसांच्या निशाण्यावर आहेत हेच यावरून दिसते. उद्यापासून पुन्हा हे आंदोलक चक्काजाम आंदोलन सुरु करणार आहेत. शासकीय कामात अडथळा, जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन अश्या कलमाने गुन्हा नोंद केले गेला आहे.
मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन बैलांना डांबरी रस्त्यावर तीन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक दिली व बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन केल्याप्रकरणी आंदोलकावर गुन्हे नोंद करण्यास सुरुवात केली आहे.
जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हे दाखल नोंद केले आहेत. सांजा व येडशी येथील ज्ञात 35 असे 70 जणांवर आणि अज्ञात 140 जणांवर पोलिसांनी गुन्हे नोंद केले आहेत. कलम 341,283,188 भादवीसह मपोका 119,135 सह कलम 11(1)(क) प्राण्यांना क्रुरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम 1960 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आनंदनगर पोलीस ठाणे अंतर्गत आंदोलक बाजीराव बप्पा सुर्यवंशी, ओम भुजंग सुर्यवंशी,संतोष सुर्यवंशी, अभिजीत काका सुर्यवंशी, सतिश मोहिते, संताजी सुर्यवंशी,बालाजी बप्पा सुर्यवंशी, विशाल मोन्या सुर्यवंशी,सतिश बप्पा सुर्यवंशी,सोहम सुर्यवंशी, काका पाटील, बाळू कदम,सुनिल नाना सुर्यवंशी, नंदु पाटील, प्रशांत सुर्यवंशी, प्रविण कदम,बालाजी सुर्यवंशी, अक्षय पौळे,ज्ञानेश्वर चंद्रकांत सावंत,धर्मराज आण्णासाहेब सुर्यवंशी, सागर शेळके,अजय सुर्यवंशी, नागेश शिंदे, जिवन जाधव सर्व रा. सांजा व बलराज श्रीमंतराव रणदिवे,सत्यजित पडवळ, निखील जगताप, मनोज जाधव, रा. मेडसिंगा, अमोल जाधव रा. कारी, अक्षय अंकुश नाईकवाडी, रा कौडगाव,धैर्यशिल बाळासाहेब सस्ते, रा. धाराशिव, हनुमंत यादव, रा. गणेश नगर,अविनाश खानापुरे रा. तांबरी विभाग, व्यंकटेश पडिले रा. बालाजीनगर व इतर 30 ते 40 जणांनी 15 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे मराठा समाजाच्या आरक्षाणासाठी आंदोलन केले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येणारे जाणारे रोडवर बैलगाडी व ट्रॅक्टर उभे करुन तसेच बैलांना डांबरी रस्त्यावर तिन दिवस उन्हात बांधून त्यांना वेदना होतील असा छळ करुन क्रुरतेने वागणुक देवून बैलगाड्या आडव्या लावून येणारे जाणारे वाहनाना अटकाव करुन मानवाच्या जिवीतास धोका निर्माध होईल अशा स्थितीत बैल रिकामे सोडून सर्व रोड बंद करुन चक्का जाम आंदोलन सुरुच ठेवून जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
धाराशिव ग्रामीण पोलीसं ठाणे अंतर्गत प्रविण देशमुख, तुकाराम पवार, संजय लोखंडे,श्रीमंत नवले, धैर्यशील सस्ते, विकास नलावडे,प्रसाद पवार,विनोद भिमराव पवार,हनुमंत शेळके,अमोल पवार, राम शिवाजी सस्ते,दत्ता बाबासाहेब काटे, सागर सस्ते,सागर कचरे,रोहीत बाबासाहेब काटे, अमीत रणखांब, शरद सावंत,संतोष पवार, बाजीराव देशमुख,संतोष दुमणे, दिपक पवार, सुरज पवार, बाबा देशमुख, दत्ता तुपे,नवले सर, किशोर पवार,देशमुख सर, महेश पवार, अक्षय जोरे,गणेश वीर, नितीन शिंदे, मामा इंगळे, चंदन नलावडे, विकास नलावडे,व इतर 90 ते 100 आंदोलकांनी 18 फेब्रुवारी रोजी येडशी येथे सोनेगाव चौकामध्ये एनएच 52 हायवे रोडवर जिल्हा अधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांचे जमावबंदी व शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केले.
बेकायदेशीर रित्या जमाव जमवून राष्ट्रीय महामार्गावर येणारे जाणारे वाहनास अडवून रहदारीस अडथळा निर्माण करुन विनापरवानगी रास्ता रोको आंदोलन करुन फिर्यादी व स्टाफ वाहतुक सुरळीत करत असताना शासकीय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी अविनाश दिगंबर शिंदे, पोलीस हावलदार यांनी दिल्याने कलम 341, 188, 141, 143, 147, 149, 353 भा.दं.वि.सं. सह मपोका कलम 135, 37(1) सह राष्ट्रीय महामार्ग कायदा कलम 8(अ) (1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.