धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे युवा नेते तथा माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील यांच्यावर पवनचक्की कर्मचारी यांना अपहरण, मारहाण, धमकी प्रकरणी दाखल झालेला गुन्हा उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आल्याची माहिती पाटील यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आनंद पाटील यांच्यावर पवनचक्की कर्मचारी यांना अपहरण,मारहाण,धमकी प्रकरणी गुन्हा नोंद होता. उमरगा तालुक्यातील कोराळ येथे हाणामारी झाली होती त्यानंतर मुरूम पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंदवला करण्यात आला होता. आनंद पाटील हे राजकीय क्षेत्रातील व्यक्ती असल्याने गुन्हा नोंद झाल्यानंतर याची मोठी चर्चा व टीका झाली होती.
पाटील यांना उमरगा जिल्हा सत्र न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाला होता. त्यावेळी न्यायालयाने कुठलीही अटी शर्त न देता त्यांना जामीन मंजूर केला होता. गुन्हा रद्द व्हावा म्हणून पाटील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजी नगर खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर ती सुनावणी होऊन उच्च न्यायालयाने आनंद पाटील यांच्यावरचा गुन्हा रद्द केला आहे. आनंद पाटील यांच्या वतीने ऍड श्रीकांत वीर यांनी उच्च न्यायालयात त्यांची बाजू मांडली.