राष्ट्रवादीच्या अर्चना पाटील यांना एकाही फेरीत मिळाले नाही यश
धाराशिव – समय सारथी
धाराशिव लोकसभेच्या निवडणूकीच्या मतमोजणीत ओमराजे निंबाळकर हे सर्वच्या सर्व 30 मतमोजणी फेरीसह पोस्टल मतमोजणीत आघाडीवर राहिले. राष्ट्रवादीच्या अर्चना राणाजगतजितसिंह पाटील यांना एकाही फेरीमध्ये यश मिळाले नाही. पहिल्या फेरीतच ओमराजे यांनी 12 हजार 566 आघाडी घेतली. ही आघाडी प्रत्येक राऊंडमध्ये सरासरी 12 ते 13 हजार मतांनी वाढत गेले. पोस्टल मताच्या फेरीत ओमराजे यांना 2 हजार 48 मतांची आघाडी मिळाली. ओमराजे यांना 5 हजार 155 तर अर्चना पाटील यांना 2 हजार 7 मते पडली. पहिल्या फेरीतच आघाडी मिळाल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी अंतीम निकालाची वाट न पाहता काढता पाय घेतला.
पहिल्या फेरीत 12 हजार 566, दुसर्या फेरीत 13 हजार 903, तिसरी फेरीत 11 हजार 365, चौथी फेरीत 15 हजार 841, पाचवी फेरीत 9 हजार 479, सहावी फेरीत 14 हजार 164, सातवी फेरीत 10 हजार 394, आठवी फेरीत 12 हजार 7, नववी फेरीत 12 हजार 647, दहावी फेरीत 14 हजार 387, अकरावी फेरीत 13 हजार 358, बाराव्या फेरीत 11 हजार 656, तेराव्या फेरीत 13 हजार 467, चौदावी फेरीत 14 हजार 166, पंधरावी फेरीत 14 हजार 166, सोळावी फेरीत 11 हजार 824, सतरावी फेरीत 11 हजार 957, अठरावी फेरीत 16 हजार 733, एकोणीस फेरीत 11 हजार 728, वीसव्या फेरीत 11 हजार 261, एकेवीस फेरीत 10 हजार 954, बावीस फेरीत 9 हजार 751,तेवीसाव्या फेरीत 10 हजार 572, चोवीसव्या फेरीत 10 हजार 99, पंचेवीस फेरीत 8 हजार 752, 26 व्या फेरीत 8 हजार 510, 27 व्या फेरीत 5 हजार 45, 28 व्या फेरीत 3 हजार 889, 29 व्या फेरीत 2 हजार 55 व 30 व्या अखेरच्या फेरीत 260 मतांची लीड मिळाली.