ड्युरा सिलेंडर स्वनिधीतुन दिल्याने अनेक रुग्णांचे प्राण वाचले
धाराशिव – समय सारथी
पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी कोरोना संकटात नागरिकांना वैद्यकीय मदत केल्याने अनेकांचे प्राण वाचले. मंत्री सावंत यांनी कोविड सेंटर सुरु करीत नागरिकांना मोफत उपचार दिले त्यामुळे ग्रामीण भागात सुविधा मिळू शकली. धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील सोनारी येथे 52 बेडचे तर बार्शी येथे अद्यावत सुविधा असलेले 1000 बेडचे रुग्णालय उभे केले. यात त्यांनी आरोग्य सेवा, औषधी मोफत दिल्या. सावंत यांनी धाराशिव जिल्हा शासकीय रुग्णालयास भेट देऊन 5 ड्युरा सिलेंडर स्वखर्चातून भेट दिले.
धाराशिव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयास 5 जम्बो ड्युरा ऑक्सीजन सिलेंडर उपलब्ध करून देत लोकसेवकाची जबाबदारी खऱ्या अर्थाने निभावण्याचे काम सावंत यांनी केले. त्यांच्या या योगदानामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेला त्यावेळी एक प्रकारे नवसंजीवनी मिळाली आहे. संकटात डॉ सावंत खरे कोरोना योद्धा ठरले. कोरोना महामारीच्या काळात जिल्ह्यात नव्हे तर देशात ऑक्सिजनची प्रचंड कमतरता व उणीव भासू लागली आहे व निर्माण झाली आहे अशा आपत्तीच्या काळात त्यांनी देवदूत म्हणून यशस्वी कामगिरी करून दिलासादायक काम केले. 1 लाख पेक्षा जास्त मास्क वाटप, 25 हजार पेक्षा जास्त गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप, अन्नधान्य किट वितरण केले.