धाराशिव – समय सारथी
खुनाच्या गुन्ह्यात धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती ए. डी. देव यांनी एका आरोपीस दोषी ठरवत 10 वर्ष कैदेची व 45 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने शिक्षा सुनावली.
आरोपी विष्णु लक्ष्मण लोंढे याचे व फिर्यादीची मयत पत्नी ही किराणा दुकानात नेहमी किराणा सामान घेवुन जाणेकरीता येत जात असल्याने दोघांची ओळख झाली व त्यातुन त्यांचे प्रेम संबंध निर्माण झाले होते. मयत व आरोपी यांच्यात फोनद्वारे बोलणे सुरू झाले. मयत घरी एकटीच असताना आरोपी हा तिचे घरात आला व त्याने मयत हीस शरीरसंबंधाची मागणी केली असता तिने विरोध केला असता आरोपीने चिडुन मयत हिचे घरातील असलेले प्लास्टीकचे बाटलीतील रॉकेल तिचे अंगावर ओतून काडीपेटीने पेटवून दिले. तु जर कोणाला सांगितल्यास तुझे नव-यावर गुन्हा दाखल करण्याची धमकी देवुन निघुन गेला.
त्यावेळी पीडिता ही भाजुन जखमी झालेने तिस शासकिय रूग्णालय, धाराशिव येथे उपचार कामी दाखल केले असता तिचेवर उपचार चालु असताना मरण पावली. मयतावर उपचार चालु असताना मयताचा मृत्युपूर्व जवाब नोंदविण्यात आला त्यावेळी आरोपीने दिलेल्या धमकीमुळे पीडीतेने तिला बांधकामावर पाणी मारत असताना ठिणग्या उडुन डिझेलचे बाटलीवर ठिणग्या पडल्या व भडका उडाला असे सांगितले परंतू उपचार चालु असताना पतीने विचारणा केल्यानंतर घटना सांगितली.
सदर प्रकरणामध्ये एस.एल. दराडे, पोलीस उपनिरीक्षक यांनी तपास करुन दोषारोपपत्र सादर केले. कोर्ट पैरवी म्हणून पवार यांनी काम पाहीले. सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने महेंद्र बी. देशमुख जिल्हा सरकारी वकील तथा शासकिय अभियोक्ता, धाराशिव यांनी एकुण 11 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली.
सदर प्रकरणामध्ये अभियोग पक्षाच्या वतीने दिलेला पुरावा व महेंद्र बी. देशमुख जिल्हा सरकारी वकील तथा शासकिय अभियोक्ता, धाराशिव यांनी केलेला युक्तीवाद ग्राहय धरून धाराशिव येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती. ए. डी. देव यांनी आरोपी विष्णु लक्ष्मण लोंढे यास कलम 304(2) अन्वये दोषी ग्राहय धरुन 10 वर्षे शिक्षा 45 हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.










