धाराशिव – समय सारथी
4 अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी 55 वर्षीय नराधमास 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली असुन धाराशिव येथील कोर्टाने हा निकाल दिला आहे. तामलवाडी येथील आरोपी तानाजी बाबूराव आगलावे असे आरोपीचे नाव आहे. तत्कालीन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे, अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश एस डी जगताप व त्यानंतर जिल्हा न्यायाधीश टी जी मीटकरी यांच्यासमोर झाली. या प्रकरणात अतिरिक्त शासकीय अभियोकता म्हणून सचिन सूर्यवंशी यांनी सरकार पक्षाच्या वतीने बाजु मांडली. यात पिडीत मुलींची साक्ष महत्वाची ठरली एकूण 7 साक्षीदार तपासण्यात आले.
विशेष म्हणजे आरोपीचे लग्न झालेले असुन त्याचे वय घटनेच्या वेळीस 55 वर्षे असतानाही चारही पिडीता या त्याच्या नातवंडाच्या वयाचे असतानाही त्याने सदरचे दुष्कर्म केले त्यामुळे 6 हजार दंड व 5 वर्षाची शिक्षा सुनावली.
पिडीत मुलगी व तीच्या 3 मैत्रिणींना सोबत गाडीवर घेवुन त्यांचे शेतात घेवुन गेले. शेतात गेल्यावर त्यांनी मुलींना चॉकलेट व बिस्कीट दिले, त्यानंतर लैंगिक अत्याचार केले. आरोपी मुलींना चॉकलेट व बिस्कीट देतो असे आमिष दाखवून शेतात न्यायचा व लैंगिक अत्याचार करायचा, त्याच्या विरोधात तामलवाडी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आल्यानंतर तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एस एल जमदाडे यांनी तपास केला.कोर्ट पैरवी अधिकारी म्हणुन पोलीस हेड कॉन्स्टेबल सी डी नरसिंगे यांनी काम पाहिले.