आर्थिक व्यवहारावर लक्ष, जास्त पैसे बाळगु नका – बँका व ऑनलाईन कारभारावर निशाण्यावर
दुष्काळ व पाणी टंचाई उपाययोजनावर आचारसंहितेचा परिणाम नाही
मतदानाचे फोटो काढल्यास गुन्हे नोंद होणार – सीमा व नाकाबंदी
दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना घरबसल्या मतदानाचा हक्क मिळणार
धाराशिव – समय सारथी
देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली असुन आचारसंहिता लागु करण्यात आली आहे. उस्मानाबाद लोकसभेसाठी 7 मे रोजी मंगळवारी मतदान होणार असुन यात 20 लाख 8 हजार मतदानाचा हक्क बजावतील. आजपासुन 52 दिवसांनी उस्मानाबादचा खासदार कोण होणार हे ठरणार आहे, या निवडणुकीसाठी प्रशासनाची पुर्ण तयारी झाली असुन यंत्रणा सज्ज झाली आहे. आचारसंहिता लागु झाल्याने त्याचा दुष्काळ, पाणी टंचाई व इतर उपाययोजना यावर कोणताही परिणाम होणार नाही.
आर्थिक व्यवहारावर निवडणुक आयोगाचे बारीक लक्ष असणार असुन एका व्यक्तीला 20 हजार पेक्षा जास्त रक्कम जवळ बाळगता येणार नाही तर अडत व्यापारी शेतकरी यांना 2 लाख तर इतर व्यापारी यांना 1 लाख जवळ बाळगता येणार आहेत. मतदान करताना त्याचे फोटो काढून सोशल मीडियावर टाकल्यास गुन्हा नोंद करण्यात येणार असुन जिल्हा व राज्याच्या बॉर्डरवर सीमा व नाकाबंदी केली जाणार आहे. दिव्यांग व 85 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना घरी बसून मतदान करता येणार आहे.
जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी डॉ सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनक घोष, सहायक निवडणुक अधिकारी शिवाजी शिंदे, शिरीष यादव यांच्यासह अधिकारी यांनी आढावा बैठक घेतली.
उस्मानाबाद लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज 19 एप्रिल पर्यंत दाखल करता येणार आहेत म्हणजे उमेदवारीसाठी 34 दिवस बाकी आहेत, त्यानंतर 3 दिवसात 22 एप्रिल पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. 22 एप्रिल ते 7 मे असे 14 दिवस प्रचाराला मिळणार आहेत. खुल्या गटासाठी 25 हजार तर इतर गटासाठी 12 हजार 500 रुपये अनामत रक्कम असुन राष्ट्रीय पक्षासाठी 1 सुचक तर अपक्ष उमेदवार अर्ज भरताना 10 सुचक लागतील. निवडणुकीत खर्चाची मर्यादा 95 लाख इतकी आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात औसा, उमरगा, तुळजापूर, उस्मानाबाद, परंडा व बार्शी असे 6 विधानसभा मतदार संघ असुन त्यात 2 हजार 139 मतदान केंद्र असणार आहेत. मतदान प्रक्रियासाठी 10 हजार 266 कर्मचारी नियुक्त असुन 2,354 बॅलेट व कंट्रोल युनिट व 312 वाहने आहेत. 19 हजार 803 दिव्यांग व 85 पेक्षा जास्त वय असलेली 35 हजार 754 मतदार असुन त्यांनी अर्ज भरून दिल्यास घरून मतदान करता येणार आहे. 18-19 वयोगटातील 37 हजार 730 मतदार असुन 20-29 वयोगटातील 3 लाख 98 हजार 314 असे 4 लाख 36 हजार 44 युवा मतदार आहेत