धाराशिव – समय सारथी
तुळजाभवानी मंदीर संस्थान मार्फत देण्यात येणाऱ्या व्हीआयपी पासची चौकशी करण्यासाठी जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थांनाचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांनी 5 जणांची समिती नेमली आहे. जिल्हाधिकारी यांनी एक प्रकारे चांगला निर्णय घेतला असुन व्हीआयपी पासच्या यादीत कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलगणा येथील भाविकांचा समावेश आहे, व्हीआयपी याची व्याख्या काय व त्यांचे लाभार्थी कोण हे समोर येणे गरजेचे आहे. पासचे रेकॉर्ड ठेवले जात असुन काही पास पुन्हा पुन्हा वापरले जात आहेत. विश्वस्त व इतर कोट्यातील व्हीआयपी पासची यादी, रजिस्टर मंदीर संस्थानने त्यांच्या वेबसाईटवर लोकांसाठी सार्वजनिक करण्याची मागणी होत आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्याकडे पण याची तक्रार केली होती.
जिल्हाधिकारी यांनी विश्वस्त असलेल्या राजकीय नेत्यांना दिले जाणारे व्हीआयपी पास बंद ठेवत पाच जणांची चौकशी समिती नेमली आहे. यात उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, मंदिर तहसीलदार, उपविभागीय पोलिस अधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश असुन आठ दिवसात समितीला अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत. समितीचा अहवाल येईपर्यंत राजकीय नेत्यांना दिले जाणारे व्हीआयपी पास मंदिर संस्थाने बंद ठेवले आहेत.
तुळजाभवानी मंदिर संस्थानमधील व्हीआयपी पास घोटाळा दैनिक समय सारथीने मांडला होता. व्हीआयपी पाचच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार आहे. ठराविक कोटा असणाऱ्या लोकप्रतिनिधीच्या नावावर पाचच्या नावाखाली भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार पुजारी व आमदार कैलास पाटील यांनी प्रशासनाकडे केली होती त्यानंतर ही समिती गठीत केली आहे. या चौकशी समितीत नेमकी काय चौकशी होणार याकडे लक्ष असणार आहे.