धाराशिव – समय सारथी
कावळेवाडी ग्रामपंचायतचे सरपंच ऍड अजित अण्णा खोत यांच्यासह 6 सदस्यांना मोठा दिलासा मिळाला असुन सहा सदस्य यांना अपात्र करण्याचा अर्ज जिल्हाधिकारी यांनी फेटाळला आहे त्यामुळे खोत यांचे सरपंच पद कायम राहणार आहे.
कावळेवाडी ग्रामपंचायतची निवडणूक दोन वर्षांपूर्वी पार पडली या निवडणुकीमध्ये ऍड अजित खोत जनतेतून सरपंच म्हणून निवडून आले त्याचबरोबर उपसरपंच ही अर्चना गुणवंत कावळे म्हणून निवडुन आले. ग्रामपंचायत निवडणुकीत पराजित झाल्याचे शल्य मनात धरून जीवन वीर यांनी सरपंच खोत यांच्यासह उपसरपंच अर्चना कावळे,सदस्य उमाबाई कावळे,आशाबाई कावळे,धनराज मेकिले, हनुमंत कावळे,अश्विनी शिंदे यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली. निवडणूक खर्च बँक खात्यातून न केल्यामुळे त्यांना अपात्र ठरवावे अशा पद्धतीचा अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल केलेला होता त्याची सुनावणी जिल्हाधिकारी यांच्यासमोर झाली.
ऍड अजित खोत यांच्यासह सहा सदस्यच्या बाजूने ऍड सुधाकर मुंडे व ऍड विशाल साखरे यांनी बाजू मांडली. त्यांनी केलेला युक्तिवाद ग्राहय धरून निकाल देण्यात आला. निवडणूक खर्च वेळेत सादर केला असल्याने तो बँकेतून नाही केला म्हणून त्यांना अपात्र ठरवता येणार नसल्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी आज दिला आहे
यावेळी ऍड अजित खोत यांच्याशी सदर निर्णयाबाबत प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी जिल्हाधिकारी यांनी जनतेच्या मताचा आदर ठेवणारा निर्णय घेतला असून गाव विकास कामाला खोडा घालणाऱ्यांना एक प्रकारे चपराकच असल्याचे सांगितले. या निर्णयाने गावातील गावाकऱ्यांनी आनंद उत्सव साजरा केला.