धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या शासकीय कामकाजातील अडचणी व तक्रारी तत्काळ सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी किर्ती किरण पूजार यांच्या संकल्पनेतून “जनता दरबार” हा उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालय, धाराशिव येथे राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नागरिकांना सोमवार,बुधवार व शुक्रवार या कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजता या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहून आपल्या समस्या आणि तक्रारींबाबत थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधता येणार आहे.यावेळी संबंधित तक्रारींसंबंधी अर्ज सुद्धा सादर करता येतील.
तरी जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा,व आपल्या शासकीय अडचणी व तक्रारी सोडविण्यासाठी “जनता दरबार” मध्ये उपस्थित राहावे,असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येते.