धाराशिव – समय सारथी
धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांना राज्य सरकारचा विशेष जिल्हाधिकारी पुरस्कार राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त श्रीकांत देशपांडे यांच्या हस्ते मुंबई येथे एका भव्य दिव्य कार्यक्रमात देण्यात आला. भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तीसाठी उत्कृष्ट कामगिरी केल्या प्रकरणी हा जाहीर करण्यात आला आहे. निवडणुक विषया संदर्भात केलेल्या उल्लेखनीय व नावीन्यपुर्ण कामगिरीच्या आधारे उत्कृष्ट जिल्हा निवडणुक अधिकारी पुरस्कार हा छत्रपती संभाजी नगर विभागातून दिला आहे.
शिरिष यादव यांची उत्कृष्ठ उप जिल्हा निवडणूक अधिकारी पुरस्कार 2024 साठी निवड करण्यात आली. तसेच उत्कृष्ठ मतदार नोंदणी अधिकारी पुरस्कार 2024 साठी संजय पाटील, मतदार नोंदणी अधिकारी उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय अधिकारी कळंब व भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी उत्कृष्ठ कामगिरी करणारी संस्था म्हणून मारुती बनसोडे, परिवर्तन सामाजिक संस्था,नळदूर्ग यांचा मुख्य निवडणूक अधिकारी यांचे हस्ते गौरव करण्यात आला.
भटक्या व विमुक्त समाजातील व्यक्तींसाठी धाराशिव जिल्हयात एकूण 61 शिबिरे घेण्यात आली. या शिबिराअंतर्गत 6 हजार 968 लाभार्थींना विविध सेवा पुरविण्यात आल्या. यामध्ये नव मतदार नोंदणी 1 हजार 295, आधार कार्ड नोंदणी व दुरुस्ती 903, शिधा पत्रिका वितरण 2 हजार 19,जात प्रमाणपत्र वितरण 2 हजार 476 व सामाजिक योजनांचा 275 लाभार्थींना लाभ देण्यात आला.
1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी, महिलांची अधिक मतदार नोंदणी, विमुक्त जाती व भटक्या जमाती मधील मतदारांची नोंदणी, तृतीयपंथी नागरिकांची नोंदणी तसेच दिव्यांग मतदारांची नोंदणी करण्यात आलेली आहे. 23 जानेवारी 2024 रोजी प्रसिध्द करण्यात आलेल्या अंतीम मतदार यादीत एकूण 13 लाख 66 हजार 722 मतदार आहेत. सदर विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत नव मतदार नोंदणी एकूण नमुना 6 चे एकूण 87 हजार 081 अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये स्त्री मतदार 43 हजार 867, पुरुष मतदार 43 हजार 201 व इतर 13 मतदार आहेत.
मयत,दुबार,स्थलांतरीतचे एकूण 62 हजार 947 नमुना 7 चे अर्ज प्राप्त झाले आहेत त्यामध्ये स्त्री मतदार 29 हजार 780, पुरुष मतदार 33 हजार 164 व इतर 3 मतदार आहेत. नाव व पत्ता दुरुस्तीचे नमुना 8 चे एकूण 27 हजार 104 अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये स्त्री मतदार 10 हजार 230, पुरुष मतदार 16 हजार 863 व इतर 11 मतदार आहेत आहेत.