धाराशिव – समय सारथी
विश्वासातून प्रगतीकडे हे ब्रीदवाक्य घेऊन सिद्धिविनायक परिवार दिवसेंदिवस यशाची शिखरे गाठत नवीन उद्योग व रोजगार निर्मिती करीत आहे. श्री सिद्धिविनायक परिवारातील येरमाळा येथील पेट्रोल पंपावर सीएनजी इंधनची सुविधा गुडीपाडाव्याच्या शुभमुहूर्तावर आजपासून सुरू करण्यात आली आहे. समूहाचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या व विकास बारकूल यांच्या हस्ते पुजन करुन शुभारंभ करण्यात आला. यावेळी मदन बारकुल, खंडेराव मैंदाड, मकरंद पाटील, शिवाजीराव गिड्डे पाटील, बालाजी कोरे , गणेश कामटे,धनंजय गुंड, मंगेश कुलकर्णी, राजेश पोळ व परिवारातील प्रमुख सहकारी उपस्थित होते. या पंपामुळे वाहन चालक यांची सोय होणार असुन पंपावर चालक, वाहक, ग्राहक यांच्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा ठेवण्यात आल्या आहेत,ग्राहकांच्या विश्वासाला आम्ही पात्र ठरू असे दत्ताभाऊ कुलकर्णी म्हणाले.
बँकिंग, कारखाना या माध्यमातून सहकार,उद्योग,व्यापार व सामाजिक कार्यात कार्यरत असलेल्या श्री सिध्दीविनायक परिवाराच्या संस्थेस केंद्रीय सहकारीता मंत्रालय, दिल्ली यांच्या कार्यालयाकडून “लोटस मल्टीस्टेट मल्टीस्पेशालीटी हॉस्पिटल व रिसर्च सेंटर” या नावाने वैद्यकीय क्षेत्रात काम करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे, लवकरच वैद्यकीय क्षेत्रात पाऊल पडेल.