धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 29 मार्च रोजी शनिवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. फडणवीस हे 29 मार्च रोजी सकाळी 10 वाजता येणार असुन त्यांच्या या संभाव्य दौऱ्याचे नियोजन सुरु असुन जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य यांनी 28 मार्चला तुळजापूर येथे नियोजन व आढावा बैठक घेतली. मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला येत असल्याने भाजपने स्वागताची तयारी केली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदीर शिखर, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.