धाराशिव – समय सारथी
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 10 जानेवारी रोजीचा धाराशिव जिल्हा दौरा काही तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आला असुन पुढील तारीख लवकरच कळवली जाईल असे जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके यांनी सांगितले. धाराशिव सोबतच त्या दिवशी हिंगोली व जिल्ह्याचे दौरे सुद्धा तात्पुरते स्थगित करण्यात आले आहेत मात्र पुढील तारीख घेऊन मेळावे होतील. लोकसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्री यांचा शिवसंकल्प अभियान दौरा 6 जानेवारी पासुन सुरु होत आहे त्याचाच एक भाग म्हणून धाराशिव दौरा होता.
आगामी लोकसभा, विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसंदर्भात मुख्यमंत्री शिंदे हे शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, बूथप्रमुख, गणप्रमुख व शिवसैनिकांशी संवाद साधणार होते. त्याची तयारी सुद्धा झाली होती मात्र अचानक दौरा रद्द करण्यात आला आहे.
आमदार अपात्रतेबाबत 10 जानेवारीपर्यंत सभापती यांनी निर्णय घ्यावा असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत, त्यामुळे तेही कारण असू शकते.