धाराशिव – समय सारथी
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 29 मार्च रोजी शनिवारी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत. फडणवीस हे 29 मार्च रोजी सकाळी 10 वाजून 40 मिनिटांनी तुळजापूर येथे सोलापूर येथून हेलिकॉप्टरने येणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस हे आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन तुळजाभवानी मंदीर विकास आराखडा सादरीकरण पाहतील. तुळजाभवानी मंदिरात पुरात्तव विभागाच्या मार्गदर्शनाखाली विकास कामे सुरु असुन मंदीर गाभारा व इतर विषय महत्वाचे आहेत.
मुख्यमंत्री झाल्यावर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा तुळजाभवानी देवीच्या दर्शनाला येत असल्याने भाजपने स्वागताची तयारी केली आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी, तुळजाभवानी मंदीर शिखर, तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास यासह अन्य मुद्यावर मुख्यमंत्री काय भुमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे. तुळजापूर ड्रग्ज तस्करी रॅकेटमध्ये 35 आरोपी असुन 21 जन फरार आहेत तर 4 जन पोलीस कोठडीत व 10 जन जेलमध्ये आहेत, या गुन्ह्यात मकोका लागणार का? आरोपीनी ड्रग्ज मधुन कमावलेली संपत्ती जप्त होऊन फरार आरोपीना अटक कधी होणार असे तुळजापूरकर यांचे प्रश्न असुन मुख्यमंत्री यावर काय भुमिका जाहीर करतातं याकडे लक्ष लागले आहे.