पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी घेतला आढावा – वस्तुस्तिथी दाखवा, सुचवले बदल
धाराशिव –
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी धाराशिव येथे साकारत असलेल्या जिल्हा रुग्णालयांच्या प्रस्तावीत इमारतीचा आढावा घेतला, यावेळी या इमारतीच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी पीपीटी व डॉक्युमेंटरी दाखवली या व्हिडीओत असलेल्या अनेक बाबीवर पालकमंत्री व खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आक्षेप घेतले. यावेळी शाब्दिक टोलेबाजी करीत इमारतीच्या प्रस्तावात आवश्यक बदल करण्याच्या सुचना देण्यात आल्या.
व्हिडिओमध्ये दाखवण्यात येणारे रुग्णालय हे चायनीज हॉस्पिटलसारखे दिसत असून डॉक्टर सुद्धा चायनीज दिसत आहेत, हे हॉस्पिटल कस सगळं सगळं चायनीज दिसत आहे, लोक जसे भारतात राहतात तसे कपड्यात दाखवा चांगले चांगले ऐवजी वस्तुस्तिथी दाखवा असे म्हणाले. इमारतीचे इलीव्हेशन चांगले ठेवा शिवाय रंग सुसंगत ठेवा, असे पालकमंत्री म्हणाले. यावेळी खासदार ओमराजे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, पोलिस अधीक्षक आमना यासह अधिकारी उपस्थितीत होते.
व्हिडिओ व पीपीटीमध्ये रुग्णालयाच्या आसपास रस्त्यावर रेंज रोव्हर गाडी फिरताना दिसत आहे, इथल्या लोकांची तितकी क्षमता नाही असा टोला खासदार ओमराजे निंबाळकर यांनी मारला. काही जण मुलगी पाहायला जाताना बारसे घालण्याची तयारी करतात असे खासदार म्हणताच आगामी 50 वर्षाचे नियोजन आहे असे पालकमंत्री म्हणाले.
रुग्णालयाच्या प्रस्तावित इमारतीत आगामी काळात होणारे बदल, गरज लक्षात घेता यंत्र साधन उपलब्ध करा. ऑक्सिजन प्लांट, लिफ्ट याची पर्याप्त उपाययोजना करा अश्या सुचना पालकमंत्री सरनाईक यांनी केल्या.